चिक्कोडी तालुक्यातील इटनाळ क्रॉसजवळ चालकाचा मिनी मालवाहू वाहनावरील ताबा सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडाला धडकल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला.

प्लॅस्टिकच्या खुर्च्या भरून सांगलीहून कित्तूरकडे जात असताना ही घटना घडली असून, जयपाल नाईक (50, रा. गणेशवाडी, महाराष्ट्र) असे वाहन चालकाचे नाव आहे. गाडीतील विजय वासकर हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत चिक्कोडीचे डीवायएसपी जी बी गौडा आणि पीएसआय बसनगौडा यांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला.


Recent Comments