अथणी नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या शिवलीला बुटाली यांची अध्यक्षपदी व उपाध्यक्षपदी भुवनेश्वरी बीरप्पा यकंची यांची बिनविरोध निवड झाली.

अथणी नगरपालिकेत एकूण २७ सदस्य असून सभापतीपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते. अध्यक्षपदासाठी शिवलीला बुटाली यांनी एकच नामनिर्देशनपत्र सादर केले होते त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली . आज अथणी नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता आली आहे.
दरम्यान, अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पुढील 30 महिन्यांसाठी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड आज बिनविरोध पार पडल्याचे सांगितले. अथणीचा विकास पाहता कोणताही पक्षीय मतभेद न ठेवता ही निवड करण्यात आली आहे. जोडकेरे यांच्या विकासासह शहरातील दहा समस्यांवर खूप जुन्या नगरपालिकेने तोडगा काढण्याची गरज आहे. आगामी काळात पालिकेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले.
यावेळी तहसीलदार सिद्धराय बोसगी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून तर मोहम्मद रफी यतनट्टी , शशिकांत डुंगी, बसवराज दाबल्ली यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून कर्तव्य बजावले.


Recent Comments