आमदार बसनागौडा पाटील यत्नाळ यांच्या कलबुर्गी जिल्ह्यातील चिंचोळी तालुक्यातील सिद्धसिरी साखर कारखान्याला प्रदूषण नियंत्रण नियमावलीनुसार परवानगी द्यावी, अशी मागणी बेळगावातील लिंगायत संघटनांच्या नेत्यांनी केली आहे.
लिंगायत संघटनेच्या नेत्यांनी बेळगावात पत्रकार परिषद घेऊन आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या कलबुर्गी जिल्ह्यातील चिंचोळी तालुक्यातील सिद्धसिरी साखर कारखान्याला प्रदूषण नियंत्रण संहितेनुसार परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली. उच्च न्यायालयात जाऊन कायदेशीर लढा देऊन पुन्हा कारखाना चालवण्यास आम. बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी परवानगी मिळवली.
या खटल्याचा युक्तिवाद आणि बचाव करताना महाधिवक्ता आणि मंडळाचे वकील उपस्थित होते. सरन्यायाधीशांनी दिलेला आदेशही त्यांना माहीत आहे. त्यांनी आदेशाची प्रत मागितली होती. तीदेखील यत्नाळांनी दिली असून एनओसी देण्यास विलंब होत असल्याची तक्रार यावेळी पत्रकार परिषदेत लिंगायत समाजाच्या नेत्यांनी केली.
ऊस गाळप हंगाम सुरु होणार असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पर्यायी साखर कारखान्याची सोय नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. प्रदूषण नियामक मंडळाच्या या कृतीचा आम्ही निषेध करतो. कारखाना तातडीने सुरू करण्यासाठी एनओसी देण्यात यावी, अन्यथा लिंगायत संघटनांकडून लढा उभारावा लागेल, असा इशारा लिंगायत समाजाच्या नेत्यांनी यावेळी दिला.
या पत्रकार परिषदेला राजू कुडसोमण्णवर, आर.के.पाटील, निंगाप्पा पिरोजी, राजू सोगल, शिवानंद तंबाके आदींसह अनेक लिंगायत नेते उपस्थित होते.


Recent Comments