Belagavi

न्यू वंटमुरी शासकीय शाळेचे क्रीडा स्पर्धेत सलग ९ व्या वर्षीही यश

Share

बेळगावच्या न्यू वंटमुरी सरकारी मॉडेल कन्नड उच्च प्राथमिक शाळेने 2024-25 सालच्या शालेय क्रीडा स्पर्धेत सलग 9व्यांदा विजेतेपदाचा पुरस्कार पटकावला.

बेळगावच्या न्यू वंटमुरी सरकारी मॉडेल कन्नड उच्च प्राथमिक शाळेने ग्रामीण विभाग भुतरामहट्टी क्लस्टर स्तरीय क्रीडा स्पर्धेंतर्गत आयोजिण्यात आलेल्या खोखो, व्हॉलीबॉल, कबड्डी, रिले, लांब उडी, उंच उडी, शॉट पुट आणि व्हील थ्रोमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सलग नवव्या वर्षी प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकाविला. यावेळी विद्यार्थिनींना वीरग्राणी पुरस्काराने गौरविण्यात आले.

एम.ए. माहुत, सीआरपी महादेवी बेळकुड, एल.एल. जमकोळी, आर.बी. बेनकट्टी, एसडीएमसी अध्यक्ष, सदस्य आणि ग्रामस्थांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

Tags: