Dharwad

मलाही मुख्यमंत्री व्हायचे आहे! : जमीर अहमद खान

Share

कोणाला मुख्यमंत्री व्हायचे नाही? अशी इच्छा प्रत्येकाला असते. माझीही ती इच्छा असल्याचे वक्तव्य मंत्री जमीर अहमद खान यांनी केले आहे. धारवाडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मंत्री जमीर अहमद खान म्हणाले, आर.व्ही.देशपांडे हे 8 ते 9 वेळा आमदार झालेले आहेत. त्यांनाही एकदा मुख्यमंत्री व्हायचे आहे. अशी इच्छा करायला काय हरकत आहे? मलाही मुख्यमंत्री व्हायचे आहे. अशी इच्छा प्रत्येकाला असतेच. देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. मात्र, आता आमच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जागा रिक्त नाही, असे ते म्हणाले.

चामुंडेश्वरी मंदिरात मुख्यमंत्री वारंवार भेट देत असल्याच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, चामुंडेश्वरी मंदिरात गेल्यामुळे किंवा चामराजनगर येथे गेल्याने सत्ता जाते असे म्हटले जाते. पण मी देखील अनेक वेळा चामुंडेश्वरी मंदिरात गेलो आहे. पण असं काही झाल्याचं मला जाणवत नाही. मुख्यमंत्र्यांचा मुडाशी काही संबंध नाही, हे एच. डी. कुमारस्वामी यांना देखील माहीत आहे. भाजप हायकमांडने सांगितल्याप्रमाणे ते वर्तन करत असून मुख्यमंत्र्यांवर दाखल झालेल्या तक्रारींचे पुढे काहीच होणार नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेनामी संपत्ती केली आहे, असा युक्तिवाद राज्यपालांच्या वकिलाने केला आहे. मात्र त्यात सिद्धरामय्यांची कोणतीच भूमिका नाही. सदर भूखंड 1935 मध्येच घेतला गेला होता. हा भूखंड त्यांनी आपल्या मोठ्या बहिणीला भेटीदाखल दिला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी कोणताही भूखंड दिल्याचे नमूद नाही.

राज्यपालांनी फिर्याद लेखी न देता तोंडी दिल्याचे आम्हाला सांगितले असल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्री बदल कोणत्याही कारणास्तव होणार नाही, सध्या मुख्यमंत्र्यांची खुर्ची रिकामी नाही त्यामुळे मुख्यमंत्री बदल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे ते म्हणाले.

Tags: