रस्ते विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करू नका, शेतकरी हा देशाचा कणा आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे विद्यमान खासदार, राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली.
मराठा मंदिर मंगल कार्यालयात सहकार महर्षी कै. अर्जुनराव गोविंदराव घोरपडे जन्मशताब्दी निमित्त मराठा सहकारी बँक, जिजामाता सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिण्यात आलेल्या जन्मशताब्दी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्याने पेरणी केली नाही तर देश उपाशी राहील. मात्र अलीकडे रस्ते बांधणीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्या जात आहेत. हे आधी थांबले पाहिजे, असे ते म्हणाले.
गरीब आणि मध्यमवर्गीयांची आर्थिक स्थिती सुधारण्यात सहकारी संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात. बेळगावातील सहकार क्षेत्राचे काम अतुलनीय आहे, अशी प्रतिक्रिया देखील खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली.


Recent Comments