बेळगावच्या स्फुर्ती सोशल वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने श्रावण महिन्यानिमित्त शेकडो महिलांची ओटी भरवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
स्फुर्ती सोशल वेलफेअर असोसिएशनच्या वतीने महांतेश नगर येथील महंत भवन येथे श्रावण महिन्यानिमित्त शेकडो महिलांची ओटी भरण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
स्फूर्ती सोशल वेल्फेअर असोसिएशनच्या सदस्यानी सांगितले की, बेळगाव शहरात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्फूर्ती सोशल वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने वरमहालक्ष्मी पूजन, ओटी भरण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून , स्फूर्ती सोशल वेलफेअर असोसिएशनच्या सर्व 187 महिला सहभागी झाल्या आहेत.

ज्योती आर.भाविकट्टी, शोभा अंगडी, प्रतिभा काखीमठ, .किरण चचडी, द्राक्षायणी पुजार , रक्षा देगीनाळ , ज्योती चराटे, सौ.नंदिता मास्तोळीमठ, श्वेता पाटील, अनिता या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.


Recent Comments