Belagavi

बेळगाव जिल्हा स्तरावर कर्नाटक राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड प्रक्रिया

Share

श्रीमती विनया यशोधर कोटियन यांच्या स्मरणार्थ होणाऱ्या कर्नाटक राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हास्तरावर निवड प्रक्रिया पार पडली.

व्हॉइस ओव्हर : बेळगाव जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन आणि बेळगाव टेबल टेनिस अकादमीचे संगम बैलूर,यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी बेळगाव क्लब, येथे कर्नाटक राज्य रॅकिंग टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड प्रक्रिया पार पडली.
प्रमुख पाहुणे म्हणून मेट्रो कॉस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक नागेश छाब्रिया व इतर मान्यवर उपस्थित होते. 11 ते 13 वयोगटातील खेळाडूंसाठी झालेल्या स्पर्धेत खेळाडूंनी चांगली कामगिरी केली.


उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. याबाबत इन न्यूजला अधिक माहिती देताना बेळगाव टेबल टेनिस अकादमीचे संगम बैलूर यांनी सांगितले की, गेल्या 15 वर्षांपासून जिल्हास्तरावर स्पर्धांचे आयोजन करून स्पर्धकांना राज्यस्तरापर्यंत वाढ करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
तनिष्का कालभैरव, हिने सांगितले की, तिने सुवर्णपदक जिंकले आहे आणि 10 सप्टेंबर रोजी हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या उपांत्य फेरीसाठी तिची निवड झाली आहे. ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली.

आता विजेते खेळाडू अभिनव , प्रसन्न, सुचेत, आणि साक्षा संतोष यांनीही आनंद व्यक्त केला.

या स्पर्धेत राज्याच्या विविध भागातून सुमारे 400 खेळाडू सहभागी झाले होते.

Tags: