सप्टेंबर महिन्यात येणारी गणेश चतुर्थी आणि ईद मिलाद हे सण उत्साहाने, शांततेने आणि सौहार्दाने साजरे करावेत, असे गोकाकचे डीवायएसपी दादापीर मुल्ला यांनी सांगितले.

हुक्केरी शहरात आज ईद मिलाद व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या शांतता सभेत ते बोलत होते.
तालुका पंचायत सभा भवन, तालुका दंडाधिकारी मंजुळा नायक यांच्या अध्यक्षतेखाली हुक्केरी पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत , हिंदू मुस्लिम समाज व राजकीय नेत्यांनी सण साजरे करण्यासाठी , पोलीस विभाग व तालुका प्रशासनाने आवश्यक मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे सांगितले. मंडप , साऊंड स्पीकर, गणेश मेळाव्यासाठी परवानगी द्या, एकल खिडकीतून परवाना द्यावा, असे सांगितले.
हुक्केरी पोलीस निरीक्षक महांतेश बसापुरे, नगराध्यक्ष अण्णाप्पा पाटील, महावीर निलजगी, जयगौडा पाटील, मोमीनदादा, सलीम नदाफ व्यासपीठावर उपस्थित होते.

तेव्हा गोकाक डीवायएसपी दादापिर मुल्ला यांनी सांगितले कि , गोकाक उपविभाग हुक्केरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेश चतुर्थी , ईद मिलाद शांततेत साजरी करावी आणि गणेशाच्या मंडपात योग्य ती खबरदारी घ्यावी, महिलांनी स्वतंत्र रांगेत यावे, तरुणांनी मिरवणुकीत शांततेत पार पाडावी , एकूणच आगामी ईद मिलाद आणि गणेशोत्सव शांततेत व्हावा, आपण सणांचा आनंद लुटला पाहिजे आणि आपल्यावर विश्वास ठेवणारे कुटुंब आहे, याची जाणीव ठेवायला हवी.
यावेळी परगौडा पाटील, गुरू कुलकर्णी, राजू मुन्नोल्ली, सलीम कलावंत, कबीर मल्लिक, चंदू गंगन्नवर, राजू मुजावर, तमन्ना पाटील, सुभाष नाईक, गवेश रवदी, पीएसआय अभिजीत , मंजुनाथ कब्बुरी, बाळेश संनक्की आणि गणेश माणके आदी कर्मचारी आणि ग्यारह जमात उपस्थित होते.


Recent Comments