भारत विकास परिषद आयोजित राष्ट्रीय समूहगीत गायन स्पर्धा , संत मीरा विद्यालय सभागृह, बेळगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडली.
बेळगाव येथील संत मीरा विद्यालयात , राष्ट्रीय समूहगीत गायन स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश अजित सोलापूरकर यांच्या हस्ते झाले.

जिल्हा न्यायाधीश अजित सोलापूरकर यांनी भाषण करून उपस्थितांना देशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि विविध कायदे याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
स्पर्धेत प्रथम क्रमांक एम. व्ही. हेरवाडकर स्कूलए पटकावला तर , द्वितीय क्रमांक के. एल. एस. शाळा व तृतीय क्रमांक बालिका आदर्श विद्यालयाने पटकावला. अमृता विद्यालय, भरतेश इंग्लिश मीडियम स्कूल आणि संत मीरा हायस्कूल यांना विशेष पारितोषिके देण्यात आली. लोकगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक एम. व्ही. हेरवाडकर विद्यालय, बालिका आदर्श विद्यालय द्वितीय तर गोगटे महाविद्यालय तृतीय आले. एम. आर. भंडारी शाळा व मुक्तांगण विद्यालयाला विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले
संस्थापक अध्यक्ष व्ही. एन. जोशी, नामजी देशपांडे, सुभाष मिराशी, श्रीनिवास शिवनगी, कॅप्टन प्रणेश कुलकर्णी, डी. वाय. पाटील, रामचंद्र तीगडी, , भारत विकास परिषदेचे सर्व सदस्य, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.



Recent Comments