काँग्रेस नेत्यांवरील मुडा , वाल्मिकी विकास महामंडळ घोटाळ्याचे लक्ष वळवण्यासाठी ते आपल्यावर आरोप करीत आहेत . काँग्रेस नेत्यांकडे कागदपत्रे असतील तर ती उघड करावीत आणि ते खटल्याला सामोरे जाण्यास तयार आहेत, असा टोला माजी मंत्री मुरुगेश निरानी यांनी लगावला .
बागलकोट येथे पत्रकार परिषदेत बोलताना माजी मंत्री मुरुगेश निरानी यांनी उद्योगमंत्री असताना भ्रष्टाचार केल्याच्या मंत्री एम.बी.पाटील यांच्या आरोपावर घणाघात केला, गौडा, आमच्यासमोर तुम्ही मिजास मारू नका. तुझी गौडकी, सत्तेचा माज माझ्यासमोर दाखवू नको , अशा एकेरी भाषेत त्यांनी टोला लगावला .
काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी राज्यपालांकडे मागितल्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना निरानी म्हणाले की, त्यांनी त्यांच्या संपूर्ण राजकीय आयुष्यात 10 रुपयांचा भ्रष्टाचार केलेला नाही. जमीन दुसऱ्याच्या नावावर खरेदी केलेली नाही. तुम्ही तुमच्या आई-वडिलांची शपथ घ्या, असे आव्हान पाटील यांना दिले.
पाटील साहेब तुम्ही काचेच्या घरात बसले आहात.. दुसऱ्यावर खोटे आरोप करताना काळजी घ्या, मी भ्रष्टाचार केल्याचा एक तरी पुरावा दाखवा, मग मी तुला नमन करतो. फक्त हवेत गोळी झाडू नका. तुमच्या आधी 15 वर्षे मी मंत्री होतो. मी तुम्हाला आव्हान देतो . असा निर्वाणीचा इशारा देत
मुडा तसेच वाल्मिकी विकास महामंडळ घोटाळ्यावरचे लक्ष वळवल्याचा आरोप करत काँग्रेस नेत्यांच्या विरोधात हवेत गोळीबार थांबवावा. माझ्याविरुद्ध कोणतीही तक्रार नसल्याचे राज्यपालांनीच सांगितले. कागदपत्रे असतील तर द्या, मी खटला चालवायला तयार आहे,’ अशी मागणी त्यांनी केली.


Recent Comments