बेळगाव महानगरपालिकेला नियमबाह्य रस्ता रुंदीकरणामुळे २० कोटींची भरपाई करावी लागणार आहे. मात्र यामुळे अधिकाऱ्यांचे पगार थांबविले जाणार नाहीत, असे स्पष्टीकरण उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार असिफ सेठ यांनी दिले.
बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना आम. असिफ सेठ यांनी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी मनपावर सध्या २० कोटींच्या भरपाईचा बोजा पडल्याप्रकरणी बोलताना ते म्हणाले, बेळगाव महानगरपालिकेला २० कोटींची भरपाई करावी लागणार आहे. मात्र यामुळे अधिकाऱ्यांचे पगार थांबविले जाणार नाहीत. भरपाई प्रकरणी आम्ही कायदेशीर लढा देणार असून शहरातील विकासकामे करण्यासाठी नगरविकास विभागाकडून 125 कोटी रुपयांचे अनुदान लवकरच महापालिकेला देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांवरील कारवाईबाबत, राज्यपालांच्या धोरणाचा निषेध करत आज काँग्रेस राजभवन चलो आंदोलन करत आहे. भाजप आणि जेडीएसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे सरकार पाडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते अयशस्वी होतील. काँग्रेसचे सर्व आमदार आणि मंत्री मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या बाजूने आहेत, असे आम. असिफ सेठ म्हणाले.
बेळगावातील वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी पावले उचलली जातील. तसेच बेळगाव महानगरपालिका आणि हेस्कॉमला शहरातील अंधार असलेल्या भागात पथदिवे सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरात वाढलेल्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी बेळगाव पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी उपाययोजना राबविण्यास सुरुवात केल्याचे ते म्हणाले.


Recent Comments