यंदाच्या गणेशोत्सवात हलाल मुक्त उत्सव साजरा करावा, तसेच गायीचा बळी देणाऱ्यांकडून कोणतीही उत्पादने खरेदी करू नका, असे आवाहन श्री राम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी केले.

बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी शहरात बोलताना ते म्हणाले की, “गाई खाणाऱ्यांकडून काहीही खरेदी करू नका, हलाल वस्तू घेऊ नका, अशुद्ध वस्तू घेतल्यास तो गुन्हा ठरेल.” यंदाच्या गणेशोत्सवात गणेशभक्तांनी भक्तिगीतांनी साजरा करावा. उत्सवासाठी लागणाऱ्या कोणत्याही वस्तू शास्त्रानुसार घ्या, शास्त्रोक्त पद्धतीने सण साजरा करा. हलाल करणाऱ्यांकडून कोणत्याही वस्तू खरेदी करू नका, असे सांगत गणेशोत्सव काळातील मिरवणुकीत दारू आणि गुटखा बंदी करावी, अशीही प्रतिक्रिया प्रमोद मुतालिक यांनी व्यक्त केली.


Recent Comments