बेळगाव शहरात एकट्या महिलांना टार्गेट करणारी टोळी सक्रिय झाली असून बेळगाव पोलीस विभाग चोरट्यांना पकडण्यासाठी कडक कारवाई करत आहे.बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त याडा मार्टिन म्हणाले की, चोरीसारख्या घटना घडल्यास तात्काळ 112 वर कॉल करा.
बेळगावात गेल्या महिनाभरापासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. खासबाग आणि टिळकवाडी परिसरात यापूर्वीही गुन्हे दाखल झाले आहेत. शहरात महिलांना टार्गेट करून लुटले जात असून शहरात पुन्हा इराणी टोळी सक्रिय झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
काल श्रावणी शुक्रवारी शहरात चेन स्नॅचिंगची घटनाघडली आहे . . काल दुचाकीवरून आलेला चोरटयांनी , खासबागमधील महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून , दुचाकीवरून पळ काढला. या चोरट्यांचा पाठलाग करून देखील काही फायदा झाला नाही. त्यांना तातडीने शोधून अटक करावी, असे आवाहन पोलिसांना करण्यात येत आहे.
खासगी भागात घरफोड्या करणाऱ्या टोळ्या गोव्यात जाऊन लपून बसल्याची माहिती मिळाल्याने बेळगाव पोलिसांसाठी हे आव्हान निर्माण झाले आहे. याआधीच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि आरटीओ विभागाच्या मदतीने वाहनाचे मॉडेल आणि रंगावरून दुचाकीचा क्रमांक कव्हर करून चोरीच्या घटनांचा छडा लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानियांग म्हणाले की, चोरीसारख्या घटना घडल्यास तात्काळ 112 वर कॉल करा.


Recent Comments