Belagavi

पराभव स्वीकारण्याची वृत्ती खेळाडूंमध्ये निर्माण व्हावी : बसवराज वण्णूर

Share

खेळात जिंकणे आणि हरणे स्वाभाविक आहे. पराभूत खेळाडूने विजेत्या खेळाडूशी हस्तांदोलन करून त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत, असे मत शालेय शिक्षण विभागाचे उपसंचालक बसवराज वण्णूर यांनी व्यक्त केले.

शालेय शिक्षण विभाग बेळगाव आणि महात्मा गांधी विश्वस्थ मंडळ, स्वतंत्र पदवीपूर्व प्री-ग्रॅज्युएट कॉलेज आणि संजय घोडावत आयआयटी – मेडिकल अकादमी बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कॉम्प्लेक्स, बेळगावी जिल्हास्तरीय प्री-ग्रॅज्युएट कॉलेजेस बास्केटबॉल, कराटे आणि सिबलम स्पर्धा २०२४-०५ चे आयोजन करण्यात आले होते.

महात्मा गांधी विश्वस्थ मंडळ बेळगावचे सचिव विनयगौडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय शिक्षण विभागाचे उपसंचालक बसवराज वण्णूर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास श्री आर्थो आणि ट्रॉमा सेंटरचे डॉ. देवेगौडा, निवृत्त शारीरिक शिक्षक जी. एन. पाटील, शारीरिक शिक्षक प्रभू शिवनायकर, श्रीधर हिरेमठ आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर बसवराज वण्णूर म्हणाले की, खेळात जिंकणे आणि हरणे स्वाभाविक आहे. पराभूत खेळाडूने विजेत्या खेळाडूशी हस्तांदोलन करून शुभेच्छा दिल्या पाहिजे. पराभव स्वीकारण्याची वृत्ती विकसित केली पाहिजे. अशा गोष्टी विजय-पराजय समानतेने स्वीकारून भविष्यात अधिक मेहनत करायला शिकवतात, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले महात्मा गांधी विश्वस्थ मंडळाचे सचिव विनयगौडा पाटील बोलताना म्हणाले, खेळ ही प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाची घटना आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागात प्रशिक्षण घेतलेले खेळाडू आज ऑलिम्पिकमध्ये पोहोचून देशाची कीर्ती उंचावत आहेत. खिलाडूवृत्ती प्रत्येकामध्ये असली पाहिजे, असे मत विनय पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी बी.आय. नेगिनहाळ, दामोदर रेड्डी यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक व खेळाडू उपस्थित होते.

Tags: