Belagavi

1 ते 30 सप्टेंबर पर्यंत “वास्तविक स्वातंत्र्य आणि त्याची प्राप्ती ” यावर जनजागृती मोहीम

Share

1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत, ‘नैतिकता हा स्वातंत्र्याचा आधार’ या ब्रीदवाक्याखाली, जमात-ए-इस्लामी हिंद कर्नाटक महिला युनिट , वास्तविक स्वातंत्र्य आणि त्याच्या प्राप्तीबद्दल जागरूकता निर्माण करणार आहे.असे विभागीय सल्लागार समितीच्या सदस्या साजीदा लालमीया यांनी सांगितले .

आज बेळगाव शहरात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या . स्वतंत्र भारतात आज खरे स्वातंत्र्य लुप्त होत आहे. त्या म्हणाल्या कि , जमात ए इस्लामी हिंद कर्नाटक महिला युनिटतर्फे खरे स्वातंत्र्य म्हणजे काय आणि ते कसे मिळवायचे याविषयी १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत ‘नीती हाच स्वातंत्र्याचा आधार’ या बोधवाक्याखाली जनजागृती केली जाणार आहे. त्यांना इतरांना त्रास न देता त्यांचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. समाजाचे रक्षण करण्याची भावना निर्माण झाली पाहिजे. महिलांचा सन्मान आणि सुरक्षितता राखली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या .

यावेळी जमात इस्लामी हिंद कर्नाटक महिला युनिटच्या जिल्हा सदस्य लाडजी, हलिमा सराफ, शाहिस्ता पठाण आदी उपस्थित होते.

Tags: