चिक्कोडी येथील खाजगी बँकेने मालमत्तेवर इतरांना कर्ज देऊन आपली फसवणूक केल्याचा आरोप रसूल मोमीन नामक व्यक्तीने केला आहे.

बँकेकडून आपली फसवणूक करण्यात आली असल्याचा आरोप करणाऱ्या रसूल मोमीन यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले, आपल्या मालमत्तेवर बनावट कागदपत्रांच्या आधारे सहा जणांना कर्ज देण्यात आले आहे. यासंदर्भात बँकेच्या कर्मचाऱ्यांना विचारणा करण्यात आली असता अर्वाच्च शब्दात शिवीगाळ करण्यात येत आहे. चिक्कोडीमध्ये काही बँक फायनान्सर्सनी लोकांची दिशाभूल करून दुसऱ्याच्या मालमत्तेवर गृहकर्ज दिले असून, मूळ मालकांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.


Recent Comments