एआयसीसी पदाधिकाऱ्यांची पुनर्रचना करण्यात आली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांची एआयसीसी सचिव/सहसचिव म्हणून त्यांच्या संबंधित सरचिटणीस/प्रभारींसह तत्काळ प्रभावाने नियुक्ती केली आहे, असे AICC सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले.

एआयसीसी सचिवपदी डॉ. अंजली निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघाच्या माजी आमदार अंजली निंबाळकर यांची दादरा नगर हवेली,दीव -दमण, गोवा येथे प्रभारी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कर्नाटकच्या पी.व्ही. मोहन आणि मन्सूर अली खान यांनाही जागा देण्यात आली आणि त्यांची एआयसीसी सचिव म्हणून केरळ, .लक्षद्वीपचे प्रभारी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.
सूरज हेगडे यांची एआयसीसी सचिव म्हणौन नियुक्ती करण्यात आली आहे आणि तामिळनाडू, पुडुचेरीचे प्रभारी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे , आरती कृष्णा यांची अनिवासी भारतीय काँग्रेस सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


Recent Comments