Kagawad

कागवाड तालुक्यातील मंगसुळी गावच्या शासकीय रुग्णालयात पैसेवसुली

Share

वैद्य नारायण हरी’ अजूनही लोकप्रिय आहे. बऱ्याच च बाबतीत डॉक्टरांनी अनेकांना पुनर्जन्म दिला आहे. इतक्या लोकांच्या अडचणींना त्यांनी प्रतिसाद दिला आहे. मात्र, कागवाड तालुक्यातील मंगसुळी ग्रामिण रुग्णालयात याच्या उलटेच चित्र पहावयास मिळत आहे. रुग्णालयात रुग्णांकडून उपचारासाठी पैसे उकळले जात आहेत .

कागवाड तालुक्यातील मंगसुळी गावच्या सार्वजनिक रुग्णालयात सलाईन आणि औषधासाठी पैसे मोजावे लागत असल्याचा गंभीर आरोप होत आहे प्रत्येक सलाईनसाठी 100 रुपये आकारत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी वरिष्ठांकडे केली आहे.

Tags: