मद्यपानामुळे अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. दारू हे वाईट व्यसन असून हे व्यसन आजच्या तरुण वर्गातही मोठ्या प्रमाणात जडले आहे, त्यामुळे आजची तरुण मंडळी आपली ताकद गमावून बसत असल्याची खंत जिल्हा जनजागृती मंचाचे अध्यक्ष संजय नाडगौडर यांनी व्यक्त केली.
ते चिकोडी तालुक्यातील , येडूर गावातील काडसिद्धेश्वर कल्याण मंडप यथे श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम विकास योजना, चिक्कोडी _2 प्रकल्प कार्यालय,बेलतंगडी अखिल कर्नाटक जन जागृती वेदिका ट्रस्ट, श्री धर्मस्थळ मंजुनाथेश्वर व्यसनमुक्ती आणि संशोधन केंद्र, बंगलोर संशोधन केंद्र कर्नाटक राज्य मद्य नियंत्रण मंडळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रगती बंधू स्वयंसहाय्य संघ मॉडेल झोन, नवजीवन समिती, ग्रामपंचायत, श्री वीरभद्रेश्वर मंदिर समिती स्थानिक संघटना आणि देणगीदारांच्या सहकार्याने 1847 व्या व्यसनमुक्ती शिबिरात बोलत होते .
श्री क्षेत्र धर्मस्थळाचे धर्मधिकारी वीरेंद्र हेगडे यांनी कर्नाटकला दारूमुक्त राज्य बनवण्यासाठी धाडसी पाऊल उचलले आहे. 1847 दारूबंदी शिबिरे आयोजित करून मद्यपींच्या जीवनात नवसंजीवनी आणली. या शिबिरात ते शिबिरार्थींच्या समस्या ऐकून घेतात, त्यावर उपाय सुचवतात, त्यांना मद्यपानामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान पटवून देतात आणि त्यांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन करतात जेणे करून ते दारूच्या व्यसनापासून दूर होऊन नवीन मार्ग अवलंबतील , असे ते म्हणाले .
नंतर प्रमुख पाहुणे म्हणून आलेले वकील, जिल्हा जनजागृती मंचाचे संस्थापक अध्यक्ष श्रीपाल मुनवल्ली म्हणाले की, धर्मस्थळ ग्रामभिवृद्धी संघाने तुमच्या वैयक्तिक व कौटुंबिक उद्धारासाठी या दारूबंदी शिबिराचे आयोजन केले आहे. व्यसनमुक्त समाज घडवण्याचे गांधींचे स्वप्न होते. त्यांचे हे स्वप्न आता धर्मस्थळाचे वीरेंद्र हेगडे पूर्ण करत आहेत. वीरेंद्र हेगडे यांच्या नेतृत्वाखालील धर्मस्थळ ग्राम विकास संघटना समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी चांगले काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
व्यवस्थापन समितीचे मानद अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य अजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, धर्मस्थळ ग्रामविकास संघाकडून आम्हाला सर्व प्रकारची मदत व सुविधा मिळतील. महापूर आणि कोविडमध्येही ही संघटना निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करत आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीला चांगले जीवन जगण्यासाठी वीरेंद्र हेगडे हे त्यांच्या सहवासातून मदत व दिलासा देत असल्याचे सांगून त्यांनी आज येडूर गावात दारूबंदी शिबिर आयोजित केले ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले
यावेळी ग्रा.पं.चे अध्यक्ष बाळू धनगर, पीडीओ रघुनाथे राजापुरे, संजय पाटील, जयपाल बोरगावे, मनोज किचडे, इरगौडा पाटील, मुकंद जाधव, राहुल देसाई, बसवराज चोंचन्नवर, डॉ.सरिता उपाध्याय, रमेश मोहिते उपस्थित होते. तालुका नियोजन अधिकारी हरीश पावस्कर यांनी स्वागत केले, तर उमेश यांनी आभार मानले .
Recent Comments