Kittur

चिक्कबागेवाडी मुख्य रस्त्याची दुरावस्था : रस्त्यातील खड्डे देत आहेत मृत्यूला आमंत्रण

Share

या रस्त्यावरून जाताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो . खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालेल्या या रस्त्यावरून जाताना वाहनधारकांनाच नाही तर पादचाऱ्यांना देखील मोठी कसरत करावी लागते . ह्या रस्त्यावर खड्डे आहेत कि खड्ड्यांमध्ये हा रस्ता आहे हेच काळात नाही . कित्तूर मतदारसंघातील चिक्कबागेवाडी रस्त्याच्या दुरावस्थेचा हा रिपोर्ट पहा .

खड्डेमय रस्ता , पूर्णतः निघून गेलेले डांबर, जीव मुठीत घेऊन चालणारी माणसं… काहीही झालं तरी मोठी समस्या होऊ शकते. होय, तुम्ही पहात असलेली ही दृश्ये कित्तूर तालुक्यातील चिकबागेवाडी गावातील आहेत. येथील रस्त्यांचे डांबरीकरण होऊन अनेक दिवस झाले आहेत. तसेच रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून, पावसाळ्यातही येथील नागरिकांचे हाल कोणी ऐकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या रस्त्यावरून ये-जा करण्यासाठी नागरिकांना त्रास होत आहे. राज्य महामार्गाला, राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे. रस्त्यावरील खड्डे पाण्याने भरले असून रस्त्यावर छोटे-मोठी तळी तयार झाली आहेत . या खड्ड्यांमुळे अनेक जण पडून जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या रस्त्याच्या दुरवस्थेच्या ड्रोन फुटेजमधून येथील भीषणता समोर आली आहे.

चिक्कबागेवाडी ग्रामपंचायतीचे अधिकारी या मार्गावरून दररोज ये-जा करतात. मात्र, या रस्त्याकडे कोणीही लोकप्रतिनिधी तसेच , कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटीलही लक्ष देत नसल्याबद्दल येथील ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत आहेत. आमचे प्रतिनिधी शानूल यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.

Tags: