श्री गणेशोत्सव 7 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, प्रभाग क्र. 29 मध्ये आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक नितीन जाधव यांनी प्राथमिक तयारी सुरू केली आहे. त्यांनी त्यांच्या प्रभागात फिरून मिरवणुकीच्या मार्गावरील खड्डे बुजवले, झाडे तोडली, पथदिवे दुरुस्त केले व इतर कामे केली.

यावेळी महानगरपालिकेचे सहाय्यक कार्यकारी अभियंता किरण मन्निकेरी, विकासक जाधव, एल अँड टी कंपनीचे अधिकारी रविनाथ त्रिपाठी, अमीत तेरागावकर , संदीप नरसगौडा, विश्वनाथ नाईक आदींचा सहभाग होता.


Recent Comments