kudachi

कृष्णा नदीवरील पूल पाण्याखाली : कर्नाटक महाराष्ट्राचा तुटला संपर्क

Share

कर्नाटक आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या रायबाग तालुक्यातील कुडची शहरातील कृष्णा नदीवरील पूल बुधवारी सकाळी पाण्याखाली गेला .

कर्नाटक आणि महाराष्ट्रातील पश्चिम घाट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीवरील पूल , यावर्षी दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला, बुधवारी सकाळी कृष्णा आणि तिच्या उपनद्यांमधून पाण्याचा प्रवाह वाढला. कुडची पोलिसांनी बॅरिकेड्स लावून सार्वजनिक वाहतूक बंद केली असून, कोणतीही वाहने जाणार नाहीत याची दक्षता घेतली आहे.

महाराष्ट्रातून जाणाऱ्या किंवा येणाऱ्या प्रवाशांना रेल्वे किंवा अन्य मार्गांवर अवलंबून राहावे लागत आहे . महाराष्ट्रातील कोयना जलाशयातून 20 हजार क्युसेक पाणी सोडण्यात येणार असून बुधवारी रात्री पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असून नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी.

Tags: