Belagavi

राजभवन दबावाखाली : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा आरोप

Share

राजभवन पूर्ण दबावाखाली काम करत असून देशातील भाजपेतर राज्य सरकारांना अस्थिर करण्याचा केंद्र सरकारचा हेतू असल्याचा आरोप मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला.

राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर बोलताना म्हणाल्या, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना न्यायालयात उत्तर दिले जाईल. कोर्टात नक्कीच विजय होईल. न्यायव्यवस्था आणि भारतीय राज्यघटनेवर आपला विश्वास असल्याचे त्या म्हणाल्या.. काँग्रेस पक्ष नेहमीच गरीबांच्या बाजूने उभा राहिला आहे. राज्यात गरीबांसाठी 5 हमी योजना आम्ही लागू केल्या आहेत आणि केंद्र सरकारने श्रीमंतांचे 16 लाख कोटी रुपये माफ केले आहेत. अशा शब्दात त्यांनी टोलाही लगावला.

Tags: