Belagavi

अंगणवाडीतील बालकांना दर्जेदार शिक्षण – दर्जेदार आहार हेच आमचे ध्येय – मंत्री हेब्बाळकर

Share

कोणतेही राजकारण न करता सर्वांना विश्वासात घेऊन बालकांना दर्जेदार शिक्षणासोबतच दर्जेदार आहार देण्याच्या उद्देशाने राज्यात माँटेसरी योजना राबविण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केली.  महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते आज बेळगाव जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील 9 नवीन सेविका व मदतनीसांना नियुक्ती आदेशाच्या प्रतीचे वाटप करण्यात आले.

यावेळी इन न्यूजशी बोलताना त्या म्हणाल्या की, अंगणवाडी शिक्षिका पदासाठी पदवीधरांची निवड झाल्यास त्या अंगणवाड्यांचे माँटेसरीमध्ये रूपांतर केले जात आहे. तीन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने सक्षम अंगणवाड्यांना अनुदान दिले असून राज्य सरकारही लवकरच अनुदान देणार आहे. अंगणवाड्यांमध्ये दर्जेदार शिक्षण व दर्जेदार आहार देण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिला व बाल विभागात अनुकंपा तत्वावर पदोन्नती तसेच काही कारणांमुळे 35 जणांना नियुक्ती आदेशाच्या प्रती देण्यास विलंब झाला.

अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडविले जातील, आज ९ नव्या सेविकांना नियुक्ती आदेश पात्रांचे वाटप करण्यात आले असून कोणत्याही दबावाला बळी न पडता, राजकारण न करता सर्वांना विश्वासात घेऊन, जे या पदासाठी पात्र आणि गरजू आहेत. त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी आदेशाच्या प्रती प्राप्त झालेल्या नवनियुक्त अंगणवाडी सेविकांचा मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Tags: