Belagavi

स्मार्ट राईडसाठी बेळगावकर सज्ज : “न्यू ज्युपिटर 133.3 सीसी’ बाजारात उपलब्ध

Share

स्मार्ट सिटी बेळगावच्या लोकांचा प्रवास आणखी स्मार्ट करण्यासाठी बेळगावच्या लोकांना नवीन वाहनांची ओळख करून देणाऱ्या हायटेक मोटर्सने आता गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर बेळगावकरांसाठी आणखी एक नवीन वाहन आणले आहे. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर ज्यांना वाहन खरेदी करायचे आहे, त्यांच्यासाठी विशेष ऑफरसह हे वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे.

गणेशोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर, बेळगाव हाय-टेक मोटर्स बेळगावकरांसाठी आधुनिक वैशिष्ट्यांसह ज्युपिटर 113.3cc बाईक सादर करत आहे. वेगा हेल्मेटचे संचालक सुहास चांडक यांच्या प्रमुख उपस्थितीत राजेश भोसगी, विनयकुमार बाळीकाई, बसवराज तंगडी, राजेंद्र देसाई, महाव्यवस्थापक विनोद काखीगुड्ड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन ज्युपिटर 113.3 सीसी या वाहनाचे अनावरण करण्यात आले. यावेळी सुहास चांडक यांनी न्यू ज्युपिटर 113.3cc चे पहिले ग्राहक महेंद्र पटेल, दीपक बिडीकर, सतीश नाईक, जयश्री पुजारी, राहुल चांडक आणि शोभा सुतार यांना चाव्या दिल्या.

टीव्हीएस कंपनी स्थापनेपासून ग्राहकांना आकर्षक वाहने पुरवून ग्राहकांना विश्वासार्ह सेवा देत आहे. वेगा हेल्मेटचे संचालक सुहास चांडक यांनी याबाबत बोलताना सांगितले कि, ज्युपिटर 133.3 सीसी वाहन आश्चर्यकारक वैशिष्ट्ये देत असून ग्राहकांना हि वैशिष्ट्ये आकर्षित करणारी आहेत .

या वाहनात नवीन नेक्स्ट जेन 113.3cc इंजिन, नेक्स्ट जेन लाइटवेट कॉम्पॅक्ट फ्युचरिस्टिक हाय-परफॉर्मन्स इंजिन, IGO असिस्ट, इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर, ISG कंट्रोलर, हाय परफॉर्मन्स बॅटरी तसेच बॉडी बॅलन्स टेक 2.0, ड्युअल हेल्मेट स्टोरेज, फ्रंट फ्युएल फिलिंग स्टेशन, इन्फिनिटी लाइटबार, एलईडी हेड लॅम्प, फॉलो मी लॅम्प, फुल डिजिटल कलर एलसीडी, ऍड ऑन फीचर्ससह टीव्हीएस स्मार्टएक्सनेक्ट, फाइंड मी फीचर, डिस्टन्स टू एम्प्टी इंडिकेशन, रिअल टाइम इंधन कार्यक्षमता, टर्न सिग्नल लॅम्प रीसेट, इमर्जन्सी ब्रेक, रोटोपेटल डिस्क ब्रेक्स, पियानो ब्लॅक फिनिश, हजार्ड लॅम्प यासह अनेक वैशिष्ट्ये आहेत. या वाहनाचे तरुणांनी अधिक कौतुक केले असून नवीन ज्युपिटर दुचाकी आमच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे. बेळगावकरांनी एकदा या वाहनाची चाचणी अवश्य करावी, आणि वैशिष्ट्ये जाणून घ्यावी, असे आवाहन टीव्हीएचएस हायटेक मोटर्सचे विनयकुमार बाळीकाई यांनी केले.

टीव्हीएचएस कंपनी नेहमीच ग्राहकांच्या मागण्या समजून घेते आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. इतिहासात प्रथमच 16 फीचर्स असलेली दुचाकी ग्राहकांसाठी सादर करण्यात आली असून आता पुन्हा एकदा या दुचाकीने ग्राहकांची मने जिंकली आहेत. उच्च मायलेज आणि नवीन फीचर्स तरुण पिढीला आकर्षित करत असल्याचे राजेंद्र भोसगी म्हणाले.

टीव्हीएस ज्युपिटर ११३.३ सीसी हि दुचाकी ग्राहकांच्या चेहऱ्यावर सुखद समाधान दर्शवित असून सणासुदीच्या निमित्ताने जर आपण नवीन दुचाकी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्या गरजेला आणि आपल्याला शोभेल असे वाहन टीव्हीएचएस शोरूम मध्ये दाखल झाले आहे. या शोरूमला अवश्य भेट देऊन नक्कीच या वाहनाचा विचार करावा. आज या वाहनाच्या अनावरण कार्यक्रमाप्रसंगी टीव्हीएचएस हायटेक मोटर्सचे ग्राहक, कर्मचारी उपस्थित होते.

Tags: