Vijayapura

विजयपूर जिल्ह्यातील नालवतवाड येथे चोरीची मालिका

Share

विजयपूर जिल्ह्यातील नालवतवाड परिसरात चोरी प्रकरणांची मालिका सुरूच असून येथील एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

विजयपूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील नालवतवाड येथे एका घरात रात्री उशिरा चोरी झाली आहे. घरात कोणी नसल्याचे हेरून चोरट्यांनी कुलूप तोडून चोरी केली असून एकाच रात्रीत सलग तीन घरांचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून पोबारा केला आहे. या घटनेनंतर मुद्देबिहाळ पोलीस स्थानकात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण ८० ग्राम सोने आणि ३० हजार रोख रक्कम चोरीला गेल्याची माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.

Tags: