बेळगाव महापालिकेतील छुप्या अजेंड्यांमुळे विकास खुंटला आहे. विकास हाच मुख्य मंत्र असून निस्वार्थीपणे सेवा केली तर बेळगावात स्वर्ग निर्माण होऊ शकतो. असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या .
आज बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, छुप्या अजेंड्यांमुळे बेळगाव महापालिकेचा कारभार नीटपणे चालवला जात नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. विकास हाच मुख्य मंत्र असून निस्वार्थ सेवा केल्यास बेळगावात स्वर्ग निर्माण होऊ शकतो, असे त्या म्हणाल्या .
आता आमदार बसनागौडा पाटील यत्नाळ यांचा साखर कारखाना बंद पाडण्याच्या प्रकरणाबाबत त्यांनी सांगितले कि , शासनाकडून कारखान्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री कोणीही असो, काँग्रेसवाले सूडाचे राजकारण करणार नाहीत . काँग्रेसवाल्यांनी द्वेषाचे राजकारण करण्याची गरज नाही. असे त्या म्हणाल्या 31 रोजी काँग्रेस राजभवन चलो आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


Recent Comments