Chikkodi

कृष्णा नदीतीराला पुन्हा पुराची धास्ती

Share

जुलै महिन्यानंतर पुन्हा पावसाने मुसंडी मारल्याने महिनाभरातच दुसऱ्यांदा कृष्णा नदीतीरावरील सहा पूल पाण्याखाली गेल्याने येथील नागरिकांना पुराची धास्ती लागली आहे.

कृष्णा, वेदगंगा, दूधगंगा नदीत पाण्याची आवक वाढली असून चिक्कोडी उपविभागातील कृष्णा नदीतीरावर असणारे सहा पूल पाण्याखाली गेले आहेत. गेल्या 20 दिवसांपूर्वी, सततच्या पावसामुळे कृष्णा नदी तीरावर मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते तसेच येथील लोकांचे काळजी केंद्रात स्थलांतर देखील करण्यात आले होते.

येथील अकोला – सिदनाळ, जत्राट – भिवशी, कारदगा – भोज, भोजवाडी – कुन्नूर, मलिकवाड – दत्तवाड आदी पूल पाण्याखाली गेले आहेत. तीन आठवड्यांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे सर्वेक्षण सुरु झाले असून पुन्हा एकदा पुराची धास्ती कृष्णा नदीतीराला लागल्याने प्रशासनाने नागरिकांच्या मदतीला धावून यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Tags: