बेळगावमधील लिंगायत महिला समाजातर्फे श्रावण महिन्यानिमित्त लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. बेळगाव शहरातील लिंगायत महिला समाजातर्फे श्रावण महिन्यानिमित्त बुधवारी लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
लिंगायत महिला समाजाच्या सदस्यांनी पारंपरिक वेशभूषा करून श्री महालक्ष्मीची पूजा केली. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने श्री लक्ष्मी स्तुती, दिपोत्सव, हळदी कुंकू, ओटी भरण्याचा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम आयोजिण्यात आले होते.

यावेळी सुनीता पाटील, शारदा पाटील, विद्या गौडा यांच्यासह कमिटीच्या सदस्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.


Recent Comments