Banglore

बसनगौडा पाटील यत्नाळ याना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्नः बसवराज बोम्मई

Share

माजी मुख्यमंत्री आणि खासदार बोम्मई यांनी आरोप केला आहे की, बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या ऊस कारखान्याला प्रदूषण नियंत्रण मंडळ परवानगी देत नसून बसनगौडा पाटील यत्नाळ याना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले .

आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अन्यायाविरोधात आंदोलनात सहभाग घेतला आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, राज्यात कायदा आणि न्याय मृत झाला आहे, द्वेषाचे राजकारण सुरू आहे.

गेल्या वर्षी प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्याना कारखान्यासाठी परवानगी दिली नाही. त्यानंतर ते न्यायालयात गेले, न्यायालयाने चार आठवड्यांत कारखाना पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले, मात्र, यत्नाळ यांनी प्रदूषण नियंत्रणाचे तांत्रिक कारण पुढे करत मंडळ खूप भेदभाव करत असल्याचा आरोप केला .

अनेक साखर कारखान्यांना परवानगी देऊन त्यांच्याशी भेदभाव केला जात आहे. ज्या कारखान्यांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे, त्यांना पीसीबीने परवानगी दिली आहे, आम्ही लढा देऊ, या कारखान्यावर या वेळी अधिक ऊस झाला आहे, हा कारखाना सुरू झाला पाहिजे. एकीकडे सरकार म्हणते उद्योगांनी उत्तर कर्नाटकात यावे. मात्र, दुसरी बाजू या प्रकाराचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Tags: