सिद्धार्थ विहार एज्युकेशन ट्रस्टला कर्नाटक इंडस्ट्रियल एरिया डेव्हलपमेंट बोर्डकडून पाच एकर जमीन मिळवून देण्याच्या प्रकरणात मंत्री प्रियांक खर्गे यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी यांनी केला आहे.
प्रियांक खर्गे यांनी अधिकाराचा गैरवापर केला असल्याची तक्रार राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याकडे विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी यांनी केली असून मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार जिंदाल कंपनीला जमिनीचे हस्तांतरण थांबवून त्याची चौकशी करण्यात यावी आणि सिद्धार्थ विहार एज्युकेशन ट्रस्टला कर्नाटक इंडस्ट्रियल एरिया डेव्हलपमेंट बोर्डकडून इतर संस्थांना दिलेल्या सर्व जमिनींची चौकशी करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन त्यांनी दिले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना चलवादी नारायणस्वामी म्हणाले, सिद्धार्थ विहार एज्युकेशन ट्रस्ट एका घरापुरते मर्यादित आहे. मंत्री प्रियांक खर्गे आणि राधाकृष्ण यांच्या नावावर हि ट्रस्ट आहे. कलबुर्गी येथे ट्रस्ट नोंदणीकृत आहे. दलित समाज हे एकट्याचे कुटुंब नाही. नसून इतर दलित कुटुंबेही आहेत असे ते म्हणाले. या ट्रस्टची अनेक एकर जमीन एकाच कुटुंबाला दिली आहे. ती जमीनही एरोस्पेसच्या नावाने घेतली आहे. हा घोटाळादेखील मुडा घोटाळ्याप्रमाणे असून त्या जागेसाठी अनेकांनी अर्ज करूनही जागा केवळ खर्गे कुटुंबालाच देण्यात आली. खर्गे कुटुंब हे एकल अनुसूचित जातीचे आहे, अनुसूचित जमातीचे कुटुंब नाही. यासंदर्भात मी पुराव्यानिशी सर्व गोष्टी सिद्ध करणार असून केवळ हिट अँड रन प्रकार मी करणार नाही असे नारायणस्वामी म्हणाले.
सिद्धरामय्या यांनी त्यांचे धर्मनिरपेक्ष तत्वज्ञान कुठे ठेवले? त्यांच्या रक्षणासाठी आता अनेक स्वामीजींचाही वापर केला जात असून स्वामीजींनी राजकारण धुवून स्वच्छ करावे, ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना वाचवण्यासाठी स्वामीजींनी मध्यस्थी करणे कितपत योग्य आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दलित समाजावर अन्याय होत असताना प्रश्न विचारला पाहिजे मात्र दलितांवर अन्याय करणाऱ्यांच्या बाजूने उभे राहणे कितपत योग्य आहे? असा सवालहि नारायणस्वामी यांनी उपस्थित केला.
काँग्रेस सरकार दलितांना मारत आहे, दलितांची फसवणूक करत आहे, दलितांच्या समाधी बांधत आहे. यावर मठाधिपतींनी प्रश्न विचारायला हवा होता. स्वामीजी दलित वर्गासाठी उभे असावे त्यांनी चुकीच्या लोकांसाठी उभे राहू नये. अलीकडे काही दलित संघटना फुटल्या आहेत असून काही दलित संघटना फसवणूक करणाऱ्यांच्या बाजूने उभ्या राहिल्याची टीकाही नारायणस्वामी यांनी केली.


Recent Comments