बेळगाव मधील सर्वोदय लिटिल चॅम्प्स गुरुकुल शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली.
शेट्टी गल्ली, बेळगाव येथील सर्वोदय लिटिल चॅम्प्स गुरुकुल शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेतील बालचमूंसह त्यांच्या पालकांनीही या कार्यक्रमात विशेष वेशभूषा करून उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी बालचमूंनी दहीहंडी फोडून आनंद साजरा केला.

सर्वोदय लिटिल चॅम्प्स गुरुकुल शाळेचे अध्यक्ष उदय हदगल म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्वोदय लिटिल चॅम्प्स गुरुकुल शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, मुलांनी कृष्ण, राधा आणि त्यांच्या पालकांनीही विशेष वेशभूषा करून विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रम सादर केले.


Recent Comments