Hukkeri

मेणबत्ती मोर्चा काढून कोलकाता महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येचा निषेध

Share

कोलकात्याच्या महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्काराचा निषेध करण्यासाठी महिलांनी मेणबत्ती मोर्चा काढला .  कोलकाता येथील आर जी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर मौनीता हिच्या बलात्कार आणि खून प्रकरणाचा निषेध करत विविध महिला संघटनांनी हुक्केरी शहरात मेणबत्ती मोर्चा काढून निषेध केला.

शिक्षिका मंजुळा आडीके, शीला खांडे यांनी सांगितले की, कोलकाता येथील मौनीता नावाच्या डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि आपल्या राष्ट्राला रामराज्य बनवायचे असेल तर महिलांना योग्य संरक्षण आणि कठोर शिक्षा देणारा कायदा लागू केला पाहिजे. ज्यांनी असे कृत्य केले आहे अशा क्रूरकर्म्याला कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली . आपण आपल्या राज्यात असे कृत्य होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून नेण्यात आला . आणि कोर्ट सर्कलजवळ मानवी साखळी करून निषेध करण्यात आला. यावेळी डॉ.जयश्री चरंतीमठ, भक्ती कोरे, प्रिया खतगल्ली, अरुंधती सबनीस, अर्चना कालकुंद्री, मेघना सबनीस, श्वेता सोल्लापुरे, भारती हुक्केरी, अर्पिता कुलकर्णी, सुषमा बोंगाळे आदी विविध महिला संघटनांच्या सदस्या उपस्थित होत्या.

Tags: