Belagavi

भगवंताप्पा अंगडी यांचे मरणोत्तर देहदान

Share

अलीकडे देहदानाविषयी जागरूकता वाढत असून अनेकजण देहदानासाठी पुढाकार घेत आहेत. बेळगाव जिल्ह्यातील मूडलगी तालुक्यातील व्यंकटपूर गावातील भगवंताप्पा अंगडी यांच्या निधनानंतर त्यांच्या अंतिम इच्छेनुसार कुटुंबीयांनी देहदानाचा निर्णय घेतला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील मूडलगी तालुक्यातील व्यंकटपूर गावातील भगवंताप्पा अंगडी यांच्या निधनानंतर त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांच्या कुटुंबीयांनी भगवंताप्पा अंगडी यांचा मृतदेह बैलहोंगल येथील डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने बेळगावच्या के एल इ रुग्णालयाच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यलयाला दान केला.

अंगडी कुटुंबीयांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत होत असून मृतांच्या कुटुंबियांची डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आणि केएलइ संस्थेच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यलयाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. मृत भगवंताप्पा अंगडी यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी आणि मोठा परिवार आहे.

Tags: