Khanapur

नंदगड येथील श्री लक्ष्मीदेवी मंदिरात विशेष पूजा

Share

खानापूर तालुक्यातील नंदगड येथे श्री लक्ष्मीदेवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.

१२ फेब्रुवारी २०२५ पासून नंदगड येथे श्री महालक्ष्मी यात्रा होणार आहे. या पार्श्वभूमीवर आतापासूनच विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात येत असून आज श्रावणी मंगळवार निमित्त श्री महालक्ष्मी मंदिरात विधिपूर्वक विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. या पूजेनिमित्त आज घरोघरी भेटी देण्याचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी पाटील बनकरी, पंचकमिटी सदस्य, देवस्थान आणि यात्रा कमिटीचे सदस्य तसेच गावकरी उपस्थित होते.

Tags: