केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तुरुंगातून फोन करून कोट्यवधी रुपयांची मागणी केली होती .मोस्ट वाँटेड अकबर पाशा याला सोमवारी रात्री नागपुरातून विमानाने आणून हिंडलगा कारागृहात पाठवण्यात आले.
मोस्ट वाँटेड अकबर पाशा याला नागपुरातूनच विमानाने बेळगावला आणण्यात आले. दहशतवादी अकबर पाशाचे दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत. अलीकडेच बेळगाव न्यायालयाच्या आवारात पाक समर्थक घोषणाबाजी करणाऱ्या जयेश पुजारी या कैद्याने हिंडलगा कारागृहातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून २०० कोटी रुपयांची मागणी देण्याची धमकी दिली होती.
या पार्श्वभूमीवर अकबर पाशा आणि जयेश पुजारी यांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. नागपूर पोलिसांनी जयेश पुजारीला काही दिवसांपूर्वी हिंडलगा येथे पाठवले होते. आता अतिरेकी अकबर पाशा याला नागपूर मध्यवर्ती कारागृहातून विमानाने बेळगावात आणून कडक पोलीस बंदोबस्तात हिंडलगा कारागृहात पाठवण्यात आले. बंगळुरू येथील खासगी वैद्यकीय महाविद्यालय स्फोट प्रकरणात अकबर पाशा सहभागी असल्याचे सांगण्यात येत आहे.


Recent Comments