Belagavi

आम.अभय पाटील यांच्या हस्ते बेळगाव जितो जैन महोत्सवाचा शुभारंभ

Share

प्रत्येकाला समाजसेवा करण्याची संधी मिळत नाही. मात्र नि:स्वार्थीपणे सेवा करणाऱ्या जितो संस्थेचे कार्य भारतभर घराघरात पोहोचले आहे, अशी प्रतिक्रिया आमदार अभय पाटील यांनी व्यक्त केली. बेळगावमधील के. एल. इ. संस्थेच्या डॉ. जिरगे सभागृहात आयोजिण्यात आलेल्या जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन संघटनेचा तिसरा महोत्सव पार पडला. या समारंभाचे उद्घाटन आमदार अभय पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले, जितो संघटना बेळगावात अनेक चांगली कामे करत आहे, आयपीएस आणि आयएएस विद्यार्थ्यांना हि संस्था मदत करत असून या संस्थेच्या कार्याचे छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी देखील कौतुक केले आहे, बेळगाव मधील संघटनेच्या उपक्रमांना माझा नेहमीच पाठिंबा आहे, प्रत्येकाला समाजसेवेची संधी मिळत नाही. या संघटनेच्या माध्यमातून समाजसेवा घडत असून निस्वार्थ भावनेने, समाजाचा विकास, मानव कल्याण सेवा, युवकांचे मार्गदर्शन अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून केलेली समाजसेवा सार्थ ठरू शकते, असे ते म्हणाले.

माजी आमदार संजय पाटील म्हणाले की, जितो संस्था आज अनेक समाजोपयोगी कामे करून लोकांमध्ये घराघरात पोहोचली आहे. अशा सेवा संस्थांच्या माध्यमातून लोकांना अधिकाधिक समाजसेवा हवी असते. धार्मिक, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात अशाचपद्धतीने समाजसेवा सेवा सुरू ठेवाव्यात, असे ते म्हणाले.

यावेळी आमदार अभय पाटील, माजी आमदार संजय पाटील, अमिता दोशी, पुष्पक हनुमानवरा, अशोक कटारिया, माया जैन आदी उपस्थित होते.

Tags: