मोहम्मद पैगंबर यांच्यावर रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत हुक्केरीतील मुस्लिम समाजाने आंदोलन छेडले.
मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांचा निषेध करत बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.
हुक्केरी शहरातील प्रमुख मार्गांवरून भव्य निषेध मोर्चा काढत हजारो मुस्लिम समाज बांधव मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी रामगिरी महाराजांच्या विरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.
यावेळी अकरा जमातचे अध्यक्ष सलीम नदाफ आणि नेते इर्शाद मोकाशी यांनी उपस्थितांना संबोधित करत मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
यावेळी उपरोक्त मागणीचे निवेदन तहसीलदारांना सुपूर्द करण्यात आले.
Recent Comments