महाराष्ट्रातील कोकण विभागात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिक्कोडी उपविभागातील नद्या दुथडी भरून वाहत असून, पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.


चिक्कोडी आणि निप्पाणी तालुक्यातील कृष्णा, वेदगंगा, दूधगंगा नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. त्यामुळे दूधगंगा नदीवरील कारदगा-भोज, भोजवाडी-कुन्नूर, मलिकवाड-दत्तवाड पुल जलमय झाले असून पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड टाकून वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. नदी पात्रातील लोकांना पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झाला आहे.


Recent Comments