केएएसच्या अ आणि ब गट परीक्षेदरम्यान बेळगावच्या अंजुमन कॉलेजमधील परीक्षा केंद्रावर ओएमआर शीटवरून गोंधळ निर्माण झाल्याने संतप्त परीक्षार्थींनी निषेध नोंदविला.

बेळगावमध्ये आज के ए एस परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर बेळगावमधील अंजुमन महाविद्यालयात के ए एस अ आणि ब गटाच्या परीक्षेदरम्यान ओएमआर शीटवरून गोंधळ निर्माण झाला. सदर परीक्षार्थींना प्रश्नपत्रिका 15 मिनिटे उशिरा आल्याने यावेळी संतप्त परीक्षार्थीनी संताप व्यक्त करत आंदोलन केले.

प्रश्नपत्रिका उशिरा मिळण्यासह प्रश्नपत्रिका देखील बदलल्याचा आरोप परीक्षार्थीनी केला. यादरम्यान परीक्षार्थी आणि पोलिस अधिकाऱ्यांची वादावादी झाली.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी तातडीने परीक्षा केंद्राला भेट देऊन विद्यार्थ्यांना अधिक वेळ देण्यासंदर्भात आम्ही के पी एस सी ला सूचना करू तसेच ओएमआर शीटसंदर्भात देखील चर्चा करू असे सांगून परीक्षार्थींची समजूत काढली.


Recent Comments