Chikkodi

महाराष्ट्रात वाढला पुन्हा पावसाचा जोर : कल्लोळ गावातील दत्तमंदिर पाण्याखाली

Share

गेल्या पंधरवड्यात उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली असून महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसामुळे सीमावर्ती भागातील चिक्कोडी तालुक्यातील कल्लोळ या गावातील श्री दत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे.

महाराष्ट्राच्या कोंकण भागात गेल्या आठवड्याभरात पावसाचा जोर वाढला आहे. पावसाची सुरु असलेली संततधार यामुळे कृष्णा, वेदगंगा नद्या पात्राबाहेर पडल्या असून नदीतीरावरील जनतेला पुन्हा पुराची भीती निर्माण झाली आहे. चिक्कोडी तालुक्यातून वाहणाऱ्या अनेक नद्या पात्राबाहेर पडल्याने कृष्णा नदी तीरावरील दत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे. सध्या या देवस्थानात दर्शनासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत.

Tags: