बैलहोंगल चचडी गावात काल सायंकाळी श्री संगमेश्वर देवाच्या रथोत्सवादरम्यान रथावरील चांदीचा मोर पडल्याने एका मुलाचा मृत्यू झाला.
शिवानंद राजकुमार सावलगी (१३) असे मृत मुलाचे नाव आहे. दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्यानिमित्त भगवान संगमेश्वराच्या रथोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली होती. 5 किलो वजनाचा चांदीचा मोर, 30 फूट उंचीच्या रथावर बसवण्यात आला होता .
हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या या जत्रेत पहिल्यांदाच चांदीचा मोर ठेवण्यात आला आहे. ज्या रस्त्यावरून रथ नेण्यात येत होता तो रस्ता दगडांनी भरलेला होता. अशा प्रकारे मंदिरापासून थोडे अंतरावर रथ ओढल्यानंतर रथाची चाके अडकली. यामुळे लोकांनी रथ जोरात ओढला असता रथावरील चांदीचा मोर खाली मुलावर पडला.
गंभीर जखमी मुलाला बैलहोंगल शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्या मुलाचा मृत्यू झाला. लगेचच रथोत्सव अर्ध्यावर थांबवण्यात आला . याप्रकरणी मुरगोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे
Recent Comments