महम्मद पैगंबर प्रकरणावरील रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचा निषेध करत बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यात मुस्लिम समाजाच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला.
बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरातील प्रमुख मार्गांवरून भव्य निषेध मोर्चा निघाला. या आंदोलनात मुस्लिम समाजातील हजारो लोक सहभागी झाले होते. यावेळी काळ्या फिती आणि काळे कपडे परिधान करून मुस्लिम समाजातील नेत्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी रामगिरी महाराजांच्या छायाचित्राला चप्पल मारून आंदोलकांनी संताप व्यक्त केला.
Recent Comments