Belagavi

श्रीपंत वाडा येथे जन्माष्टमी उत्सव भक्तिभावात

Share

बेळगावच्या समादेवी गल्ली येथील श्री पंत जन्माष्टमी उत्सव समिती व यमुनाक्का भजनी मंडळातर्फे श्री पंत जन्माष्टमी उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

सालाबादप्रमाणे यंदाही श्री पंत वाडा येथे श्री पंत जन्माष्टमी उत्सव समिती व यमुनाक्का भजनी मंडळाच्या वतीने पारंपारिक भजन, नामस्मरण, गायन आदी कार्यक्रम आयोजिण्यात आले होते. परमपूज्य रंजन पंत, राजन पंत, संजीव पंत आणि रोहन पंत यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.

पंत वाड्यात महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अनंत किल्लेकर, भारतभूषण सायनेकर, डॉ. महेंद्र राणे, वैभव सायनेकर, समीरा कागले, राजेश पावशे, अवधूत सायनेकर, सुनंदा किल्लेकरा, सुषमा सायनेकर आदींनी परिश्रम घेतले.

Tags: