election

उगारखुर्द नगरपालिकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक

Share

सोमवारी उगार खुर्द पालिका सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार राजेश बुर्ली यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. नगरपालिकेच्या अध्यक्षपदी फातिमा रसुल नदाफ यांची तर उपाध्यक्षपदी सतीश कृष्णा जगताप यांची निवड झाली.

यावेळी बोलताना राजू कागे म्हणाले, उगार, ऐनापुर, शेडबाळ, कागवाड या गावांच्या विकासासाठी मी जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी व खासदार प्रियांका जारकीहोळी यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून अधिक निधी आणून विकासासाठी प्रयत्न करेन.

एकूण 23 सभासद असलेल्या उगार खुर्द नगरपालिकेत 5 अपक्ष, 7 भाजप आणि 11 काँग्रेसचे सदस्य असे संख्याबळ आहे. या निवडणूक प्रक्रियेत आमदार राजू कागे आणि खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या १-१ मताने काँग्रेसचे उमेदवार विजयी ठरले. यावेळी विजयी उमेदवारांनी उगार खुर्दच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी नूतन अध्यक्षा फातिमा नदाफ व उपाध्यक्ष सतीश जगताप यांनी आपल्या कार्यकाळात पंचायत अंतर्गत सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातील. राज्य सरकारच्या योजनांची पुरेशी अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू. असे आश्वासन देत आपली निवड केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

यावेळी ऐनापुर नगरपंचायतीच्या अध्यक्षा सरोजिनी गाणींगेर, उपाध्यक्षा रत्नव्वा सदाशिव मादार, कन्नड समर्थक संघटनेचे अध्यक्ष डॉ. सिद्धगौडा कागे, कागवाड ब्लॉक अध्यक्ष विजयकुमार अकिवटे, कृष्णा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब विसापुरे, दिलीप हुल्लोळ्ळी, सचिन शिंगे, ईश्वर कांबळे, शेखर कुराडे, विक्रम भोसले, प्रदीप चिंचवडे, वीरभद्र कटीगेरी, अरविंद कट्टेरी, अरविंद पाटील, अरविंद पाटील, संजय शिंदे, राजू मदने आदी उपस्थित होते.

यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढून, फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत आनंद साजरा केला.

Tags: