अभिनेता दर्शन केस प्रकरणी गृहविभाग पाऊले उचलत असून कायद्यासमोर सर्वजण समानच आहेत, अशी प्रतिक्रिया मंत्री प्रियांक खर्गे यांनी व्यक्त केली.

कारागृहात अभिनेता दर्शनला मिळणारे आदरातिथ्य आज दिवसभर चर्चेत आले असून याप्रकरणी बेंगळुरू येथे प्रतिक्रिया देताना प्रियांक खर्गे म्हणाले, अभिनेता दर्शन प्रकरणी चर्चा करण्यासाठी आपण येथे आलो नाही. कुणाला अशापद्धतीने सुविधा पुरविण्याबाबत सरकार सांगत नाही. अभिनेता दर्शन हा खूनप्रकरणी अटकेत आहे. त्याला शाही आदरातिथ्य मिळत आहे हि बाब सरकारचीच लाजिरवाणी असल्याचे मत त्यांनी मांडले.
सरकारचा हेतू असा राहू शकत नाही. काही व्यक्तींकडून सरकारची बदनामी होत आहे. याबाबत गृहमंत्री योग्य ती कारवाई करतील. कोणीही असो, कायदा मोडण्याचा अधिकार नाही. संविधान आणि कायदा सर्वांसाठी एक आहे. मीठ खाल्ल्यास पाणीदेखील प्यावे लागते. याप्रकरणी भाजपचा मोठा दबाव असून कोणत्याही दबावाला बळी न पडता आत्तापर्यंत या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने करण्यात आल्याचे प्रियांक खर्गे यांनी स्पष्ट केले.


Recent Comments