भगवान विष्णूचा आठवा अवतार श्री कृष्ण यांचा जन्मदिवस जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवासाठी जन्माष्टमीची रात्र विशेष मानली जाते. याचाच एक भाग म्हणून बेळगावमध्येही श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
बेळगावमध्ये घरोघरी आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सोहळा मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात साजरा झाला. अनेक ठिकाणी बालचमू श्रीकृष्ण आणि राधेच्या वेशभूषेत दिसून येत होते. बेळगावमधील श्री कृष्ण भावनामृत संघाच्या इस्कॉन मध्ये श्री कृष्णा जन्माष्टमीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयॊजन करण्यात आले होते.

हरे रामा, हरे कृष्णाच्या जयघोष करत आज हजारो भाविकांनी इस्कॉन मंदिरात गर्दी केली होती. जन्माष्टमीनिमित्त विशेष सजावट, पूजा, दर्शन, आरती, अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले.
इस्कॉनचे गौरांग प्रसाद दास यांनी इन न्यूजशी बोलताना सांगिले कि, भगवान श्रीकृष्ण हे पूर्णपुरुषोत्तम आहेत. भगवान विष्णूने वाईट शिक्षेपासून धार्मिक संरक्षणासाठी युगानुयुगात विविध अवतार घेतले आहेत. मानवजातीच्या उद्धारासाठीच्या त्यांच्या कल्पना आदर्शवादी आहेत. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्य आज इस्कॉनमध्ये मंगलआरती, दर्शनआरती, भागवत, अभिषेक, नृत्य – प्रवचन, दहीहंडी यासह इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

जन्माष्टमीनिमित्त बेळगावमधील इस्कॉन मंदिरासह विविध ठिकाणी असणारी श्रीकृष्णाची मंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलली होती. सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयॊजन करून श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली.


Recent Comments