actors

अभिनेता दर्शनचा कारागृहातून व्हिडीओ कॉल! गृहमंत्री संतापले! ७ कर्मचारी निलंबित

Share

रेणुकास्वामी हत्येप्रकरणी पराप्पा कारागृहात कैद असलेला अभिनेता दर्शन याचे राऊंडींसोबतचे फोटो आणि व्हिडीओ कॉल वरील संभाषण पुढे आले असून याप्रकरणी ७ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

यासंदर्भात गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी संताप व्यक्त केला असून याप्रकरणी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. राज्यातील सर्व कारागृहात सीसीटीव्ही, जॅमर बसवले आहेत. मात्र, अशा घटना घडल्यास अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे काम करण्याची गरज आहे. अशा घटनांना जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून अशा घटना घडू नयेत यासाठी खबरदारी घेण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

सध्या ७ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या घटनेत तुरुंग अधिकाऱ्यांचा थेट हात असेल तर आम्ही त्यांना निलंबित करू. यामध्ये कोणतीही गय केली जाणार नाही. कर्मचारी आणि अधिकारी यांच्यात भेदभाव केला जाणार नाही, असे ते म्हणाले. यापूर्वी दर्शनाला तुरुंगात चिकन बिर्याणी दिल्याची बातमी पसरली होती. मात्र तशी घटना घडणार नसल्याचे मी वक्तव्य केले होते. कारागृहात घडलेल्या घटनेचे मी समर्थन करत नाही परंतु अशा घटना घडू नयेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

कारागृहात यापूर्वीच जॅमर लावण्यात आला आहे. पण त्याची फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर अडचणी उद्भवू शकतात. अभिनेता दर्शन चहा पिताना, सिगारेट ओढताना त्याचा फोटो कुणी काढला? कारागृहात मोबाईल कसा आला? याची चौकशी करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री म्हणाले.

तुरुंगात सर्वांना दर्शन घेण्याची परवानगी नाही. जेलरने परवानगी दिली तरच परवानगी दिली जाते. तपासात सर्व काही बाहेर येईल. फोन वापरण्याची परवानगी कोणी दिली? सिगारेट कशी मिळाली? या सर्वांची चौकशी केली जाईल. येथील सीसीटीव्ही निरंतर सुरु असतात. यामुळे सर्व गोष्टी उघड होती. यात दोषी आढळलेल्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

माझ्यावर कोणतेही दडपण नाही. अभिनेता दर्शन आणि आणखी काही तुरुंगातील आरोपींना दुसऱ्या कारागृहात हलवण्याचा विचार करत असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

Tags: