पराप्पा कारागृहातील अभिनेता दर्शनच्या फोटोच्या व्हायरल प्रकरणामध्ये सरकारचे अपयश आहे. आज घडत असलेल्या घटनांकडे बघून राज्यात सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही, असे जाणवते. साक्ष नाश करण्यासाठी साक्षीदारालाच घाबरवण्याचा हा डाव आहे अशी टीका केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली.
आज हुबळी येथे बोलताना ते म्हणाले, रेणुकास्वामी खून प्रकरण सरकारने गांभीर्याने घेतले नाही. याप्रकरणी आम्ही माध्यमांचे आभार मानतो. नाहीतर अशापद्धतीने फोटो जाहीर होणे शक्य नव्हते. हि एक पुरावे नष्ट करण्याची रणनीती आहे. दर्शन प्रकरणानंतर अधिकारी स्वत:ला हिरो समजत होते. दर्शन प्रकरणानंतर एसीपी देखील उद्दाम पणे वागत असून हे सर्व पाहिल्यास सरकार आपले संरक्षण करत आहे असे वाटत नाही. हे सरकार सर्वसामान्यांसाठी नसून श्रीमंतांसाठी आहे.
सरकारला किमान नैतिकता असणे आवश्यक आहे. मात्र सरकार दर्शन प्रकरणी कट रचून त्याला सोडण्याच्या तयारीत आहे. याबाबत मी आज मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र लिहिले असून यात काही राजकारण्यांचा हात असल्याची शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.
Recent Comments